आर आर पाटील 0

आबा म्हणतात, ‘नक्षलवादाशी लढणार तरी कसं?’

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय.

May 28, 2013, 06:08 PM IST

बसमधील स्फोट फटाक्यांमुळेच - आर आर

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.

May 12, 2013, 04:04 PM IST

पनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई

पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.

May 5, 2013, 10:46 AM IST

'सासनकाठ्यांच्या उंचीवर मर्यादा नाही'

सासनकाठ्यांच्या उंचीवर प्रशासनाने मर्यादा आणू नये, असा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलाय. त्यामुळं ज्योतीबाच्या चैत्र यात्रेतील सानकाठ्यांच्या उंचीची प्रश्न सुटला आहे.

Apr 20, 2013, 04:07 PM IST

अजित दादांचं आत्मक्लेश उपोषण संपलं

कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.

Apr 14, 2013, 07:56 PM IST

महिला-दलितांसाठी महाराष्ट्र सुरक्षित, आबांचा दावा

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.

Mar 26, 2013, 12:30 PM IST

अजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

Mar 21, 2013, 06:14 PM IST

आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mar 20, 2013, 04:52 PM IST

हैदराबाद स्फोट : महाराष्ट्र करणार सर्वोतोपरी मदत

तपास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

Feb 23, 2013, 01:38 PM IST

राज ठाकरेंना आबांचे जशासतसे उत्तर

सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना धमकावतात असा आरोप कोल्हापुरच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. आता गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

Feb 17, 2013, 12:13 PM IST

आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय. ५७ हजार रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिलं आहे.

Feb 8, 2013, 05:36 PM IST

‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!

कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

Feb 1, 2013, 09:51 AM IST

आर आर पाटील आणि नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नवे औद्योगिक धोरण आणि महिलांवरील अत्याचारांवरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

Jan 9, 2013, 06:46 PM IST

भुजबळांच्या चौकशीला अखेर गृहखात्याची परवानगी

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्य़ा एसीबीमार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजूरी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राटं देताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राटे मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

Sep 18, 2012, 02:40 PM IST

राज… बिहारमध्ये येऊन दाखवा - अबू आझमी

शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...

Sep 1, 2012, 06:23 PM IST