आर आर पाटील 0

`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`

जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.

Dec 17, 2013, 10:34 AM IST

संजय दत्तच्या पॅरोलची चौकशी करणार - गृहमंत्री

पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी संजय दत्त यास 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पत्नी मान्यता हिच्या आजाराचे कारण देऊन ही रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, आजारी असणारी मान्यता कार्यक्रमात कशी काय उपस्थित राहाते? यामुळे संजय दत्तची रजा वादात सापडली. त्यामुळे याप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांनी टार्गेट करण्यात आल्याने त्यांनी अधिक माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Dec 7, 2013, 03:40 PM IST

पोलिसांच्या घरांसाठी मिळणार १ हजार कोटी?

पोलिसांच्या घरासाठी एक हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे.

Nov 10, 2013, 08:19 AM IST

पोलीस दलात नोकरीची संधी

अजूनही पोलिस दलात २५०० पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता आहे, तर राज्याच्या पोलिस दलात अजूनही ६२ हजार पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत ही पदे भरली जाणार आहेत.

Sep 29, 2013, 04:59 PM IST

तंटामुक्त गावात बक्षिसांमुळेच तंटा!

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाचं तंटामुक्त योजनेलाही राज्यात हरताळ फासला जातोय. तंटामुक्त गावाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळेच गावातल्या शांततेचा भंग होतोय.

Aug 27, 2013, 06:37 PM IST

मनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!

ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...

Aug 24, 2013, 10:23 PM IST

‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.

Aug 23, 2013, 09:32 PM IST

आरोपींची जाहीर धिंड काढा – उद्धव ठाकरे

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा सामूहिक बलात्कारासारख्या घटना पुरावा आहे. आरोपींवर कारवाई करण्याआधी त्यांची जाहीर धिंड काढावी तरच जरब बसेल असे रोखठोक मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Aug 23, 2013, 08:55 PM IST

‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’

फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.

Aug 23, 2013, 08:52 PM IST

शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Aug 23, 2013, 07:56 PM IST

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, गृहमंत्र्यांचे मौन!

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत.

Aug 23, 2013, 08:49 AM IST

राज ठाकरेंना आबांनी दिलं चोख प्रत्यूत्तर!

‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.

Jul 22, 2013, 09:40 AM IST

... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार

गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

Jul 6, 2013, 11:57 AM IST

मुंडेंनी आठ कोटी आणले कुठून?- आर आर पाटील

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. आर. आर. पाटील यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. निवडणूकीसाठी मुंडेंनी ८ कोटी रुपये आणले कुठून? असा थेट सवाल त्यांनी मुंडेंना या सभेत केला आहे.

Jun 30, 2013, 07:16 PM IST

गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?

सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.

Jun 21, 2013, 11:23 AM IST