इमारत दुर्घटना

महिना उलटला; डॉकयार्ड दुर्घटनाग्रस्तांना दिलासा कधी?

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेला दोन महिने उलटले तरी मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई, निवारा किंवा नोकरी यापैंकी काहीही मिळालेलं नाही.

Nov 28, 2013, 04:54 PM IST

कहर... दुर्घटनेतील जखमींकडे डॉक्टरांनी मागितले पैसे!

माझगाव डॉकयार्डमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेकडून रक्त तपासण्यासाठी इथल्या डॉक्टरांनी निर्लज्जपणे पैसे मागितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली.

Oct 1, 2013, 11:55 AM IST

इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ६१ वर गेला असून ४८ तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Sep 29, 2013, 08:00 AM IST

इमारत दुर्घटना : डेकोटरेटरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.

Sep 28, 2013, 07:20 PM IST

इमारत दुर्घटना : पत्रकार योगेश पवार यांचा मृत्यू

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून कार्यरत असणाऱ्या अवघ्या २९ वर्षीय योगेश पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Sep 28, 2013, 05:53 PM IST

इमारत दुर्घटना : ‘तो’ बारा तासानंतर सुखरूप...

डॉकयार्डमधली बाबू गेनू मंडई इमारतीमधून बारा तासानंतर एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा कुत्रा ढिगा-याखाली बारा तास होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी या कुत्र्याला बाहेर काढलं

Sep 28, 2013, 11:28 AM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

Sep 28, 2013, 08:04 AM IST

मुंबई डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ३१ जणांचा बळी

मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ३१ जणांचा बळी गेलाय. तर ३० जण जखमी आहेत. तर अजून सुमारे २७ जण बेपत्ता आहेत. आज एकाला जिवंत बाहेर काढण्यास जवानांना यश आलंय.

Sep 28, 2013, 07:32 AM IST

इमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली

एकीकडे असं संकट अक्षरशः कोसळलं असताना त्यातही प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. मदतकार्यावर असलेल्या जेसीबीचा ऑपरेटर पैसे आणि दागिने चोरत होता..

Sep 27, 2013, 06:37 PM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ११ वर पोहचलीय तर जखमींची संख्या ४२ वर पोहचलीय.

Sep 27, 2013, 12:21 PM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : ४ जणांना ढिगाऱ्यातून काढले, २ गंभीर

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sep 27, 2013, 10:07 AM IST

इमारत दुर्घटना : अखेर सरकारला जाग!

कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.

Jul 4, 2013, 02:07 PM IST

दृष्टी मिळाली पण भविष्यात मात्र अंधार...

मुंब्र्याच्या लकी कंपाऊंड दुर्घटनेत १८ तासानंतर बचावलेल्या संध्या ठाकूर या चिमुरडीला पुन्हा एकदा दृष्टी मिळालीय.

Apr 17, 2013, 09:30 AM IST