election 2017

शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू

शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Jan 16, 2017, 08:34 AM IST

शिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक

आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Jan 16, 2017, 08:24 AM IST

उद्धव ठाकरेंचे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना मंत्र्यांना स्पष्ट आदेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेली पक्षाच्या मंत्र्याची बैठक संपली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्याना सक्त आदेश दिलेत. सर्वांना जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी जावेच लागेल, असे बजावले आहे.

Jan 13, 2017, 07:05 PM IST

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.

Jan 11, 2017, 04:32 PM IST

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहा लाइव्ह

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.

Jan 11, 2017, 10:04 AM IST

उत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी

निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.

Jan 10, 2017, 11:53 PM IST

आरक्षणानंतर कोणते नगरसेवक आहेत सेफ

 मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

Oct 4, 2016, 09:36 PM IST