अरे देवा! चिमुकल्यांनी भरलेल्या School Van चा अपघात; रस्त्याशेजारील पाण्याने भरलेल्या...

शहराच्या वेशीवर बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅन रस्त्याच्या कडेला पाणी साचलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या व्हॅनमध्ये 12 ते 16 शाळकरी विद्यार्थी होते व सुदैवाने सर्व बचावले. दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अमर काणे | Updated: Aug 8, 2022, 11:16 AM IST
अरे देवा! चिमुकल्यांनी भरलेल्या School Van चा अपघात; रस्त्याशेजारील पाण्याने भरलेल्या... title=

नागपूर :  शहराच्या वेशीवर बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅन रस्त्याच्या कडेला पाणी साचलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या व्हॅनमध्ये 12 ते 16 शाळकरी विद्यार्थी होते व सुदैवाने सर्व बचावले. दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

सकाळी रोहन उच्च माध्यमिक स्कूल असं लिहलेल्या या स्कूल व्हॅनमध्ये इतर शाळेचे 12-16 विद्यार्थी घेऊन व्हॅन चालली होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले व व्हॅन सरळ शेजारील पाणी साचलेल्या खड्ड्यात पडली. दरम्यान पाणी साचलेल्या खड्ड्यात व्हॅन कोसळल्याचे पाहताच शेजारीच असलेले तरुण धावले आणि सर्व मुलांना बाहेर काढले. दोन विद्यार्थी जखमी झाले. 

या अपघातात जखमी विद्यार्थ्यांना केशव रुग्णालयात उपचारकरता नेण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांचे पथकदेखील पोहोचले. व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते. शाळेला व पालकांनादेखील लगेच माहिती देण्यात आली.