भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Jul 1, 2020, 10:42 PM IST
भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.  भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व, भारताची सुरक्षा तसंच राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोका असल्यामुळे या ऍप्सवर बंदी घालत असल्याचं सरकारने सांगितलं. 

चीनच्या ऍप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचं अमेरिकेने स्वागत केलं आहे. भारताच्या 'क्लिन ऍप' मोहिमेमुळे त्यांच्या सार्वभौमत्व, अखंडत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिली आहे. 

भारताने फक्त ऍप्सच नाही तर हायवे प्रोजेक्ट्समध्येही चीनच्या कंपन्यांना गुंतवणूक करायला बंदी घातली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. चीनच्या कोणत्याच कंपनीला भारतात हायवे प्रोजेक्ट्स बांधण्याच्या कंत्राटासाठी अर्ज करता येणार नाही. चीनच्या कंपन्यांना भारतातल्या किंवा इतर देशांच्या कंपन्यांसोबत जॉईन्ट व्हेन्चरच्या माध्यमातूनही अर्ज करता येणार नाही. याआधी भारतीय रेल्वेनेही अशाच प्रकारे चीनी कंपन्यांना मज्जाव केला आहे.