Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 7 जुलै रोजी शुक्र ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीत बदल करतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राचे वर्णन सौंदर्य आणि शारीरिक सुखाचा कारक म्हणून करण्यात आलंय. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्यांच्या जीवनात धन, धान्य आणि सुखाची कमतरता नसते.
7 जुलैपासून शुक्र सिंह राशीत असेल, याच राशीत मंगळ आधीच उपस्थित आहे. एकाच राशीतील शुक्र आणि मंगळाचे संक्रमण खूप फायदेखील होणार आहे. हे गोचर प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणार आहे. मात्र यामध्ये अशा काही राशी आहेत, ज्यांना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
सिंह राशीत शुक्राच्या गोचरचा मेष राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होईल. कुटुंबातील सदस्यांमधील जुने वादही दूर होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या असतील तर त्या संपुष्टात येतील. कलात्मक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींसाठी वेळ चांगली आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर सामाजिक स्तरावर खूप चांगलं राहणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. तसंच या काळात तुम्हाला भरपूर पैसाही मिळू शकणार आहे. शोध करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक प्रवास करण्याचा होणार आहे. कामाच्या ठिकाणी क्षेत्रात चांगले परिणाम मिळणार आहे. या गोचर दरम्यान तुम्हाला भरपूर पैसाही मिळू शकेल.
शुक्राचं गोचरमुळे या राशींवर चांगला परिणाम देणार आहे. शुक्राचं हे गोचर तुमच्या वैवाहिक जीवनासाठीही खूप अनुकूल असणार आहे. जुन्या केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. हे संक्रमण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात प्रगतीची संधी मिळणार आहे. शांती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमणही खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्यासाठी पैसे मिळवण्याच्या नवीन संधी खुल्या होतील. आर्थिक समस्या असलेल्या लोकांना यश मिळेल. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक खुलणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )