FTII च्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांची पुणे येथील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते गजेंद्र चौहान यांची जागा घेतील. गजेंद्र चौहान यांची या पदावरील नियुक्ती फारच वादग्रस्त ठरली होती.

Updated: Oct 11, 2017, 02:53 PM IST
FTII च्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांची पुणे येथील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते गजेंद्र चौहान यांची जागा घेतील. गजेंद्र चौहान यांची या पदावरील नियुक्ती फारच वादग्रस्त ठरली होती.

आता गजेंद्र सिंह यांनी अनुपम खेर यांच्याकडे अध्यक्षपद गेल्याने आनंद व्यक्त केलाय. अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजपच्या खासदार किरण खेर यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय. एका वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, ‘मला अनुपम खेर यांच्यावर खूप गर्व आहे. ते चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडतील. मी सरकार आणि मोदींचे आभार मानते’. 

FTII च्या विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांची या पदासाठी निवड झाल्यावर त्याविरोधात आंदोलन केलं होतं. हे आंदोलन देशभरात पेटलं होतं. पण तरीही एक वर्षासाठी गजेंद्र चौहान यांना या पदावर ठेवण्यात आलं होतं. आता अनुपम खेर यांची या पदासाठी नियुक्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद असल्याचं बोललं जात आहे.