Aryan Khan आणि अनन्या पांडेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक! किंग खानच्या मुलाला पहिल्यांदा हसताना पाहून म्हणाले...

Aryan Khan Ananya Panday Video: आर्यन खान आणि अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आर्यन अनन्याशी बोलताना हसताना दिसला. त्याला हसताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2023, 09:32 PM IST
Aryan Khan आणि अनन्या पांडेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक! किंग खानच्या मुलाला पहिल्यांदा हसताना पाहून म्हणाले... title=
(Photo Credit : Koimoi Instagram)

Aryan Khan Ananya Panday Viral Video: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान हा नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खान (Aryan Khan) हा चर्चेत असणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. आर्यनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हा केव्हा तो पार्टीत जातो तेव्हा त्याचे व्हिडीओ समोर येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लहानपणीचे मित्र असूनही आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करताना दिसला. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघे बरेच दिवस चर्चेत होते. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे. 

अनन्या आणि आर्यनचा हा व्हिडीओ कोईमोईनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अनन्यानं पांढऱ्या रंगाचं टॉप परिधान केलं आहे तर आर्यननं काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ क्रिकेट स्टेडियममधील आहे. या व्हिडीओत अनन्या आणि आर्यन खूप गप्पा मारताना दिसत आहेत. तर अनन्याशी बोलत असताना नेहमीच अॅन्ग्री यंग मॅन दिसत असणारा आर्यन हसताना दिसला आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : स्विमिंग सोडून वेदांत अभिनय क्षेत्रात करियर करणार? आर. माधवनने स्पष्टच सांगितल...

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, मी याला हसताना पाहिलं बापरे. दुसरा नेटकरी म्हणाला, एक पुरुष हा फक्त त्याच्या आवडत्या महिलेकडे बघून फक्त हसतो. तिसरा नेटकरी म्हणाला, आर्यन तिच्याकडे दुर्लक्ष करतो हे बोलणारे आता कुठे आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, कोणीतरी आहे जो अनन्यासोबत पर्फेक्ट दिसत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ते दोघं एकत्र किती सुंदर दिसत आहेत. तिसरा नेटकरी म्हणाला, यानं एकदा कॅमेऱ्यासमोर अनन्याला इग्नोर केलं होतं ना.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Koimoi.com (@koimoi)

आर्यन आवडतो अनन्यानं केला होता असा खुलासा

कॉफी विथ करण या शोमध्ये करणनं अनन्याला आर्यनविषयी प्रश्न विचारला होता की लहाणपणापासून तुम्ही एकत्र असताना कधी तुझं त्याच्यावर क्रश होतं का? त्यावर उत्तर देत अनन्या म्हणाली, तो क्यूट आहे आणि माझं त्याच्यावर क्रश होतं. त्यावर पुढे करण म्हणाला, त्याचं पुढे काही झालं का? मग अनन्यानं काही उत्तर दिले नाही आणि म्हणाली आर्यनला विचारा