''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल

Deepika Padukone: दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Trolled) अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.

Updated: Feb 17, 2023, 10:39 PM IST
''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल title=

Deepika Padukone Gets Trolled: दीपिका पादूकोण आणि सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान यांच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा ( Deepika padukone Trolling) सामना करावा लागला होता त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर याचा परिणाम होईल असा अंदाज प्रेक्षकांना वाटत होता कारण याआधी एकूणच लाल सिंग चड्ढा आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटांना बॉयकॉट ट्रेण्डचा मोठा फटाका खावा लागला होता त्यामुळे पठाणचे बॉक्स ऑफिसवरचे भविष्य काय असेल यावर अनेक चर्चा संवादही झाले होते. परंतु पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र चित्र पालटले आणि पाहत पाहता पठाण या चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर गल्ला भरला आहे. (Bollywood Actress Deepika Padukone Gets trolled after travelling in economy class read the full story)

दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते. त्यामुळे दीपिकाही विशेष चर्चेत आली होती. आता दीपिका पादूकोण ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण फार वेगळं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात दीपिका पादूकोण चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसते आहे. विमानात मस्तपैंकी फर्स्ट क्लासनं प्रवास करण्याऐवजी दीपिका पादूकोण इकोनॉमी क्लासनं प्रवास करते आहे. 

तिच्या या व्हिडीओनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दीपिकानं केशरी रंगाचे स्पोर्ट्सवेअर परिधान केले आहे. त्यामुळे दीपिकानं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी विमानात बसलेल्या चाहत्यांनी तिला ओळखलंच आहे. विमानात प्रवास करणाऱ्या एका चाहत्यांना मात्र तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका ही वॉशरूममध्ये (Economy class and First Class) जाताना दिसते आहे. 

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यामध्ये दीपिका पादूकोणला असं इकोनॉमी क्लासमध्ये बसलेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यातून नेटकरीही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करताना दिसत आहेत. यामध्ये तिला काही ट्रोलर्स असं विचारत आहेत की, तुला पठाण चित्रपटातून पैसे मिळाले नाहीत का? दीपिका पादूकोण हिला इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून तिला पठाण चित्रपटावरून ट्रोल करण्यात आले आहे.

सध्या हा व्हिडीओ सगळीकडे तूफान व्हायरल होतो आहे.