आमिरच्या श्रमदानात रणबीर कपूरचाही सहभाग...

बॉलिवूड रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Updated: May 16, 2018, 10:53 AM IST
आमिरच्या श्रमदानात रणबीर कपूरचाही सहभाग... title=

मुंबई : बॉलिवूड रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणबीर, संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टिझरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान रणबीरने त्याच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि पत्नी किरण राव यांच्यासोबत श्रमदान केले. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टनेही आमिर खानसोबत श्रमदान केले होते. त्यानंतर आलियाच्या पावलावर पाऊल ठेवत आमिरनेही श्रमदान केले.

या कॅम्पेनची सुरुवात आमिर खानने आपल्या पानी फाऊंडेशनच्या अंतर्गत केली. या कॅम्पेनच्या अंतर्गत तो महाराष्ट्रातील दुष्काळी भागात काम करत आहे. आमिरच्या या भल्यामोठ्या कामाला रणबीरनेही आपला हातभार लावला. आमिर खान आणि रणबीर कपूरचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

 

There's a new #Jalmitra on the block! @ranbir_kapoor_official joined shramadaan at village Dahindule this morning. A warm welcome to him Sharing shramadaan expertise, @_aamirkhan showed Ranbir the ropes. Kiran Rao was hard at work too. And a watershed structure was created! #BattleAgainstDrought #PaaniFoundation #SatyamevJayate #WaterCup2018

A post shared by Paani Foundation (@paanifoundation) on

रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टसोबत ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फर्स्ट शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले. आता लवकरच संजू सिनेमातून रणबीर रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले आहे.