'गर्लफ्रेंड' युलियाचे गाणे प्रमोट केल्याने सलमान खान झाला ट्रोल

'आता दुसऱ्यांचे करिअर बनवणे सोडून दे' असा खोचक सल्ला सलमानला देण्यात आला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 15, 2018, 10:05 AM IST
 'गर्लफ्रेंड' युलियाचे गाणे प्रमोट केल्याने सलमान खान झाला ट्रोल title=

नवी दिल्ली : बॉलीवूडचा सुलतान सलमान खान नेहमी नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो.

त्याने आपली कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरच्या गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला.

सलमानने यूलियाला तिच्या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या पण नेटकऱ्यांनी त्यालाच ट्रोल केले. 

या गाण्यात युलिया आणि मनिश पॉल एकत्र दिसणार आहेत.  'आगामी गाण्यासाठी ऑल द बेस्ट युलिया आणि मनिष' असे सलमानने आपल्या पोस्टवर लिहिले. 

गाणं सोडून दे 

ट्रोलर्सनी सलमान आणि युलियावर निशाणा साधला. 'आता दुसऱ्यांचे करिअर बनवणे सोडून दे' असा खोचक सल्ला सलमानला देण्यात आला.

'तू सिंगिग सोडून दे आणि आमच्यावर उपकार कर असा सल्ला यूलियाला देण्यात आला.' 

ढिंचॅक पूजाशी तुलना 

ट्रोलर्स एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी यूलियाची तुलना ढिंचॅक पूजाशी केली.