...म्हणून तनुश्री आणि विनताने अजयला सुनावले खडेबोल

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि निर्माती विनता नंदा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावण्याची मागणी केली आहे. 

Updated: Apr 18, 2019, 12:56 PM IST
...म्हणून तनुश्री आणि विनताने अजयला सुनावले खडेबोल  title=

मुंबई : गतवर्षी #Metoo मोहीमेने चांगलाच जोर धरला होता. पण अद्यापही हे वादळ काही शमलेले दिसत नाही. महिन्याच्या सुरूवातीला अभिनेता अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. १७ मेच्या मुहूर्तावर 'देदे प्यार दे' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चिपटात संस्कारी बाबू उर्फ अलोकनाथ यांची भूमिका आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि निर्माती विनता नंदा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावण्याची मागणी केली आहे. 

निर्माती विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता. विनता बोलल्या की, 'प्रेक्षक या चित्रपटाचा नक्कीच विरोध करतील. आजची तरूण पिढी फार आशावादी आहेत. ते अन्याय सहन करणार नाहीत. त्यांचा आताचा लढा एकाच निर्णयावर ठाम राहणाऱ्यांसाठी असणार आहे'.

खऱ्याचा मुखवटा घातलेले हे शहर आहे. खोट्यावृत्तीचे लोक येथे आहेत असे वक्तव्य अभिनेत्री तनुश्री दत्ताने केले आहे. #Metoo मोहीमे नंतर बॉलिवूडमध्ये अनेकांनी याचे समर्थन केले आहे. पण जेव्हा बॉक्स ऑफिसचा प्रश्न येतो तेव्हा इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही आदेशाचे पालन करण्यात येत नाही. त्यांची राजनीती आणि विचारशक्ती फक्त बोलण्यासाठी आहे, असे तनुश्रीचे म्हणने आहे. 

ऑक्टोबर २०१८ला अजय देवगणने ट्विटरवर पोस्ट केलेल्या शेअर मध्ये #metoo मोहीमे अंतर्गत आरोप करण्यात आलेल्यांबरोबर काम न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याने #metoo मोहीमचे समर्थन केले होते. 'माझ्या कंपनीमध्ये महिलांना सन्मान आणि सुरक्षा देण्यास प्रधान्य दिले जाते. जर कोणत्या स्त्रिसोबत अन्याय होत असेल तर मी त्याच्या विरोधात असेल' असे वक्तव्य अजयने ट्विटरच्या माध्यमातून केले होते.

चित्रपटात अजय ५० वर्षाचा दाखवण्यात आला आहे आणि तो २४ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये तब्बल २६ वर्षांचा फरक आहे. चित्रपटात अजय तब्बू आणि रकुल प्रित मुख्य भूमिका साकारकाना दिसणार आहे.