Urvashi Rautela चा लाल साडीत धमाकेदार डान्स , व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Mar 9, 2021, 01:59 PM IST
Urvashi Rautela चा लाल साडीत धमाकेदार डान्स , व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावते. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. येत्या काही दिवसांमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तिचे लाखो किमतीचे कपडेही चर्चेत असतात. आता उर्वशी रौतेलाने आता पावसात तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला.

१० तासांत  मिळाले ९ लाख व्ह्यूज

या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला लाल रंगाच्या साडीमध्ये दिसली आहे. तिच्यावर जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. ती पावसात भिजत डान्स करत आहे. हा व्हिडिओ उर्वशीने रात्री उशिरा इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला अवघ्या १० तासांत ९ लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

शूटिंगच्या दरम्यानचा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये दिसणारा हा पाऊस कृत्रिम आहे आणि हा व्हिडिओ शूटिंग दरम्यानचा आहे. किशोर कुमार यांच्या 'एक लडकी भीगी भागी सी' गाण्यावर उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela) डान्स करत आहे. नुकतेच या गाण्याचे रीमिक्स प्रसिद्ध झाले आहे.

म्यूजिक अल्बमला ८०  लाख व्यूज

त्याचे हे व्हिडिओ गाणे रिलीज झाल्यापासून ते लोकांची मने जिंकत आहेत. हे आतापर्यंत ८० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात उर्वशीने मधुबालाच्या लूकची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या सिनेमामध्ये दिसणार ऊर्वशी 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर उर्वशी रौतेला अखेर 'व्हर्जिन भानुप्रिया' मध्ये दिसली होती. ती लवकरच 'ब्लॅक गुलाब' मध्येही दिसणार आहे, हा थ्रिलर  सिनेमा आहे. हा हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल. नुकतीच उर्वशी रौतेलाच्या तमिळ रिमेक फिल्म 'थिरूट्टू पायल 2' च्या फर्स्ट लूकवर बरीच चर्चा रंगली. याशिवाय लवकरच जॉन अब्राहम सोबतही पुढील चित्रपटात दिसणार आहे. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेला रणदीप हूडासह 'इंस्पेक्टर अविनाश' या मालिकेत दिसणार आहे. नुकतेच त्याने त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.