आयटीबीपीच्या जवानांसाठी आता मॅट्रीमोनियल पोर्टल

येथे लग्न जमणार... 

Updated: Dec 19, 2019, 11:00 PM IST
आयटीबीपीच्या जवानांसाठी आता मॅट्रीमोनियल पोर्टल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशात पहिल्यांदाच सुरक्षा रक्षकांसाठी एक असं पाऊल उचललं गेलं आहे, ज्या निर्णयाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे, तर अनेकांची दादही मिळवली आहे. कारण, हा निर्णयही तसाच आहे. सहसा ITBP आयटीबीपी, म्हणजेच इंडो- तिबेटन बॉर्डर पोलीस या तुकडीमध्ये सेवेत असणाऱ्या जवानांच्या लग्नाबाबत कायमच चिंता व्यक्त केली जाते. 

बर्फाळ प्रदेशात देशाची सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीच्या जवानांविषयीची हीच चिंता लक्षात घेता आता या सैनिकांच्या लग्नाबाबत काळजी घेतली जात आहे. ज्यासाठी आयटीबीपीने एक मॅट्रीमोनियल पोर्टल सुरू केलं आहे. आययटीबीपीतच आयुष्यभरासाठीचा जीवनसाथी भेटावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ९ डिसेंबरला दिल्लीमध्ये हे पोर्टल सुरु करण्यात आलं. मुख्य म्हणजे पुरुष आणि महिला जवानांसोबतच विद्धा, घटस्फोट झालेल्यांनाही या पोर्टलमुळे नव्या जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. 

आयटीबीपीमध्ये जवळपास २५ हजार अविवाहित जवान आणि एक हजार अविवाहीत महिला आहेत. ज्यांच्यामधील अनेकांनीच लग्नासाठी मॅट्रीमोनियल पोर्टलद्वारे शेकडो रजिस्ट्रेशनही केल्याचं कळत आहे. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसारस, 'पोर्टल सुरु केल्यानंतर अवघ्या एका आठवड्याभरातच त्यावर जवळपास १५० जणांनी नोंदणी केली आहे. ही फक्त एक सुरुवात असून, येत्या काळात एका व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठीही हे पोर्टल प्रयत्नशील असेल असं सांगण्यात येत आहे. 

'ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत', जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप 

पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिशय कठिण अशा कामाच्या सुवरुपामुळे अनेकदा आयटीबीपी जवानांना मनाजोगा साथीदार भेटत नाही, हीच दरी भरुन काढण्यासाठी या पोर्टलचे प्रयत्न असतील. या पोर्टलवर जवानांच्या खासगी माहितीविषयी आवश्यक तितकी गोपनीयताही पाळण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून हनी ट्रॅप होणार नाही, यावर करडी नजर असणार आहे.