कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: भाजपला निवडणुकीपूर्वीच धक्का, काँग्रेसचे पारडे जड

कर्नाटकमध्ये भाजपपुढे काँग्रेसचे जोरदार आव्हान असून, ओपिनियन पोलनेही भाजपविरोधी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अधिकच अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे.

& Updated: Apr 14, 2018, 05:31 PM IST
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: भाजपला निवडणुकीपूर्वीच धक्का, काँग्रेसचे पारडे जड title=

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. मात्र, भाजपपुढे काँग्रेसचे जोरदार आव्हान असून, ओपिनियन पोलनेही भाजपविरोधी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अधिकच अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे. किंग कोण? नावाने कर्नाटक विधासभा निवडकुणीपूर्वी एक ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. ज्यात काँग्रेसचे पारडे बरेचसे जड आहे. या सर्व्हेत दिलेल्या माहितीनुसार, आजच्या तारखेला जर कर्नाटकमध्ये निवडणुक झाली तर, २२५ जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस ९० ते १०१ जागा जिंकत काँग्रेस कर्नाटकमधील सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर, भाजपला केवळ ७८ ते ८६ जागांवरच समाधान मानावे लागेल. जेडीएस आघाडीला ३४ ते ४३ जागा मिळतील असा अंदाजही या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभेतील विद्यमान पक्षीय बलाबल

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक महिन्यांचाच कालावधी आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष विजयाचे दावे करत आहेत. पण, ओपिनियन पोल काही वेगळेच सांगत आहे. सध्यास्थितीत कर्नाटक विधानसभेत काँग्रेस १२२, भाजप ४३, जेडीएस २९ आणि इतर १४, १६ जागा रिक्त, तर, एका जागेवर अॅंग्लो इंडियन समुदायाचा प्रतिनिधी अशी पक्षीय बलाबल आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्स यांनी मिळून हा सर्व्हे केला आहे. १७ मार्च ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत एकून २२४ मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेदरम्यान, २७,९१९ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील ६२ टक्के लोक हे ग्रामिण भागातले होते. तर, ३८ टक्के लोक हे शहरी भागातील होते. 

राहुल गांधींच्या मंदिर दर्शनाचा काँग्रेसला फायदा

सर्व्हेनुसार ५२ टक्के लोकांनी काँग्रेसकडून खेळण्यात आलेला लिंगायत कार्डचा मुद्दा मान्य केला आहे. तर, २८ टक्के लोकांनी याला मुद्दा मानन्यास नकार दिला आहे. ४२ टक्के लोकंनी राहुल गांधीं मंदिरात गेल्याचा काँग्रेसला फायदा झाल्याचे म्हटले आहे. तर, ३५ टक्के लोकांचे म्हणने असे की, राहुल गांधींच्या मंदिर प्रवेशाचा काँग्रेसला फायदा होणार नाही. २० टक्के लोकांनी या मुद्द्यावर मौन बाळगले आहे. 

सिद्धरामय्यांना मुक्यमंत्री म्हणून पसंती

दरम्यान, सर्व्हेदरम्यान सिद्धरामय्या यांना मुक्यमंत्री म्हणून लोकांनी सर्वाधिक पसंदी दर्शवली. ३३ टक्के लोकांचे म्हणने असे की, सिद्धरमय्या दुसऱ्यांदा मुक्यमंत्री बनतील. २६ टक्के लोकांना वाटते येडियुरप्पा मुख्यमंत्री बनू शकतात. ७३ टक्के लोकांनी सिद्धरामय्या यांच्या कन्नड भाषेला अनिवार्य करण्याच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. 

१२ मे ला मतदान १५ मे ला निकाल

दरम्यान, १२ मे रोजी कर्नाटकातील सर्व जागांवर निवडणुका होत आहे तर, १५ मे या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या दिवशी कर्नाटकच्या जनतेच्या मनात काय आहे याचा उलघडा होणार आहे.