Share Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य

Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Updated: Nov 27, 2022, 02:39 PM IST
Share Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य title=

Uniparts India IPO : अभियांत्रिकी समाधाने उत्पादक कंपनी Uniparts India चा IPO (IPO) 28 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये येत आहे. या IPO मधून 836 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. (Upcoming IPO) त्यामुळे तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची आवड असेल, तर पुन्हा एकदा गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. 

युनिपार्ट्स इंडिया या अभियांत्रिकी सोल्युशन्स उपलब्ध करणाऱ्या कंपनीचा IPO 28 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडेल. IPO मधून 836 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी 548-577 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीचा IPO खरेदीची संधी मिळणार आहे. (अधिक वाचा - Special Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी )

30 नोव्हेंबरला होणार सार्वजनिक 

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, तीन दिवसीय इश्यू 30 नोव्हेंबरला सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 2 डिसेंबरला बंद होईल. एकंदर गुंतवणूकदार 29 नोव्हेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. IPO पूर्णपणे प्रवर्तक गट आणि विद्यमान गुंतवणूकदारांच्या 14,481,942 समभागांच्या विक्रीच्या ऑफरवर (OFS) आधारित आहे. पब्लिक इश्यूमधून कंपनीला कोणतीही रक्कम मिळणार नाही. (Bathing Tips: दिवसभर फ्रेश राहण्यासाठी... आंघोळ करताना या 5 गोष्टी पाण्यात मिसळा आणि बघा )

2018 मध्ये मिळाली होती मान्यता  

यूनिपार्ट्सने 2018 मध्ये मान्यता मिळवली होती. Uniparts ने यापूर्वी डिसेंबर 2018 आणि सप्टेंबर 2014 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) IPO ची प्रारंभिक कागदपत्रे सादर केली होती. त्यासाठी मंजुरीही मिळाली होती, मात्र त्यानंतर कंपनीने आयपीओ आणला नाही.

जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही किमान 15,000 रुपयांची बुकिंग करु शकता. तुम्हाला 15,000 रुपयांना लिस्टिंगच्या वेळी 26 शेअर मिळण्याची शक्यता आहे. जर स्टॉक प्रीमियमसह उघडला तर तुम्हाला नफा देखील मिळेल.

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)