Special Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी

High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Updated: Nov 27, 2022, 09:42 AM IST
Special Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी title=

FD Investment: गुंतवणूक करताना काळजी घेतली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो.  आता FD मध्ये गुंतवणूक करणे मोठे फायद्याचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत एफडीवर इतके कमी व्याज दिले जात होते की लोकांनी एफडी बंद करण्यास सुरुवात केली होती. वास्तविक, हे सर्व घडले कारण, आरबीआयने कमी व्याजाने कर्ज देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुमच्या बँकांनी Fd आणि इतर खात्यांवरील व्याजदरही कमी केले आहेत. मात्र आता पुन्हा कर्ज महाग होत आहे. याचा लाभ लोकांना मिळू लागला आहे. अलीकडेच बजाज फायनान्स लिमिटेडने एक विशेष एफडी योजना सुरु केली आहे. ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला जात आहे.  (Bajaj finance fd rates)

विशेष योजनेचा लाभ घ्या 

बजाज फायनान्स लिमिटेडची (Bajaj finance) ही विशेष योजना सुरु झाली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना  7.95 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे, मात्र एवढे मिळवण्यासाठी त्यांना 44 महिन्यांची एफडी करावी लागेल. दुसरीकडे, बिगर ज्येष्ठ नागरिकांना 44 महिन्यांसाठी 7.70 टक्के दराने व्याज दिले जात आहे. सामान्य नागरिकांसाठी 12 ते 23 महिन्यांच्या संचित एफडीमध्ये 6.80 टक्के व्याज दिले जात आहे, तर 15 महिन्यांच्या विशेष एफडी अंतर्गत 6.95 टक्के व्याज दिले जात आहे. (अधिक वाचा - Bathing Tips: दिवसभर फ्रेश राहण्यासाठी... आंघोळ करताना या 5 गोष्टी पाण्यात मिसळा आणि बघा)

एनबीएफसींना बँकांपेक्षा चांगला परतावा मिळतो 

Covidच्या उद्रेकादरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)व्याजदरात मोठी कपात केली. जे लोक अद्यापही FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, त्याचे नुकसान झाले आहे. NDFC ने याचा फायदा घेतला आणि आपल्या ग्राहकांना FD वर चांगला परतावा दिला. आम्ही तुम्हाला सांगतो की बहुतेक NBFC बँकांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. दरम्यान, RBI बँक आणि NBFC या दोन्हींचे व्याजदर नियंत्रित करते.  

बजाज फायनान्सने विशेष एफडी योजना

यावेळी बजाज फायनान्सने (Bajaj finance) खास एफडी लॉन्च केली आहे. ज्याअंतर्गत बँक ग्राहकांना FD वर चांगले व्याज देत आहे आणि हा व्याजदर असा आहे की, सध्या कोणतीही बँक या कालावधीसाठी असा परतावा देत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की CRISIL ने या FD ला AAA/STABLE आणि [ICRA]AAA (स्थिर) रेटिंग दिले आहे. म्हणजेच ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई वाढल्यामुळे प्रमुख धोरणात्मक दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या कारणामुळे एफडीचे दरही वाढतील.