Bathing Tips: दिवसभर फ्रेश राहण्यासाठी... आंघोळ करताना या 5 गोष्टी पाण्यात मिसळा आणि बघा

Bathing Tips For Freshness: दिवसभर आपला उत्साह टिकून राहण्यासाठी आंघोळ करताना 5 गोष्टी पाण्यात मिसळा. त्यामुळे तुम्ही दिवसभर एकदम फ्रेश राहाल आणि काम करण्याची मरगळ दूर होईल.

| Nov 27, 2022, 09:11 AM IST

Bathing Tips For Freshness: रात्री झोपल्यानंतर आपण सकाळी उठल्याबरोबर स्नान करण्यास प्राधान्य देतो. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आंघोळ करणे क्रमप्राप्त असते. आंघोळ हा आपल्या दैनंदिन क्रियाकलापांचा एक भाग आहे. शरीराला स्वच्छता आणि ताजेपणा मिळण्यासाठी हे काम खूप महत्त्वाचे आहे. स्नान केल्याने घाम तसेच घाणीमुळे होणारे आजार होण्यापासून बचाव होतो आणि ताजेतवाने वाटते. प्रत्येकाची आंघोळीची पद्धत वेगळी असते, काही जण बादलीत पाणी भरुन आंघोळ करतात, काहीजण शॉवरने आंघोळ करतात, तर काहीजण बाथटबची मदत घेतात. मात्र, आंघोळीच्या पाण्यात 5 गोष्टी मिसळाव्या जेणेकरून दिवसभर ताजेपणाची भावना कायम राहते. जाणून घ्या या पाच गोष्टींबद्दल.

1/5

लिंबू आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. घामामुळे येणारी दुर्गंधी आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

2/5

ग्रीन टीचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, होय तुम्ही आंघोळ करताना याचा वापर करू शकता. ग्रीन टी पाण्यात मिसळून आंघोळ केली तर घामाचा वास नाहीसा होतो.

3/5

तुरटी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. बादली किंवा टबमध्ये तुरटी मिसळल्यास शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

4/5

अनेक वेळा आपल्या शरीरात खूप वास येतो, म्हणून सर्वप्रथम आंघोळीचे पाणी कोमट करुन त्यात खडा मीठ मिसळा. असे केल्याने तुमची दुर्गंधी दूर होईल आणि तुम्हाला दिवसा ताजेतवाने वाटेल. 

5/5

कडुलिंबाच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेला रोगांपासून वाचवतात. आंघोळीपूर्वी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिसळा. यामुळे त्वचेचा संसर्ग, खाज आणि घाण दूर होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)