शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार

शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2018, 05:59 PM IST
शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार title=

मुंबई : शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलेय. याआधी शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे कर्नाटकात आपले उमेदवार उभे करुन राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा विस्तार करण्याच्या हालचाली शिवसेना करत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. देशपातळीवर राजकारण करण्यासाठी शिवसेनेने पाऊल उचलल्याचे दिसत आहे. 

कर्नाटक निवडणूक एक्झिट पोल, धक्कादायक निकालाचा अंदाज

महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० - ५५ ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहे. तशी घोषणा शिवसेनेने नेते खासदार संजय राऊत यांनी केलेय. तर बेळगाव येथे शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केलाय. तेथे शिवसेनेचे उमेदवार नसणार आहेत.

तुझे तुकडे तुकडे करेन, भाजप महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी

भाजपला तगडे आव्हान असणार!

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेथे भाजपने जोरदार प्रचार करण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यात. मात्र, या ठिकाणी काँग्रेसने लिंगात समाजाला अल्पसंख्यांक दर्जा देऊन जातीचे कार्ड पुढे केलेय. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक सोपी असल्याचे म्हटले जातेय. त्यातच भाजपविरोधात आता सेनेचे उमेदवार असल्याने याचाही परिणाम भाजपवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोण बाजी मारणार, याची उत्सुकता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. प्रथमच व्हीव्हीपीएटी मशिनवर ही मतमोजणी होणार आहे. त्यामुळे येथे पुन्हा काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता आहे. तसेच शिवसेना प्रथमच या निवडणुकीत उतरत असल्याचे सेनेच्या कामगिरीकडेही लक्ष लागलेय.