एकतर्फी प्रेमात मुलीने खाणंपिणं सोडलं, म्हणाली ''लग्न करीन तर तुझ्याशीच'' मुलाने गाठलं पोलीस स्टेशन

तरुणी आपल्या हट्टावर ठाम आहे. तरुणीने मनाशी ठरवलेलं, लग्न करेन तर याच्याशीच नाहीतर कुणाशीच नाही, अगदी सिनेमातल्या 'तु नही तो और कोई नही' टाईप.

Updated: May 12, 2022, 04:16 PM IST
एकतर्फी प्रेमात मुलीने खाणंपिणं सोडलं, म्हणाली ''लग्न करीन तर तुझ्याशीच'' मुलाने गाठलं पोलीस स्टेशन title=

मध्य प्रदेश : हे प्रकरण नेहमीपेक्षा वेगळंय. अनेकदा मुलं एकतर्फी प्रेमात पडतात. मात्र मुलांना जी आवडते ती, त्यांना ढुंकून ही विचारत नाही. मग तु मला हो म्हणाली नाहीस, नकार दिलास तर जीव देईन, वगैरे टाईप धमक्या दिल्या जातात. आतापर्यंत तुम्ही आम्ही असे अनेक प्रकार पाहून किंवा ऐकून आहोत. (young girl one sided love in madhya pradesh youth go police station for help)
 
त्याचं झालं असं की, तरुणी एकतर्फी प्रेमात पडली. तरुणीचा जीव जडला. नवलेश कुशवाहा असं त्या भाग्यवान तरुणाचं नाव. तरुणीने आपल्या प्रेमाची कबूली दिली. लग्नासाठी मागणी घातली. मात्र नवलेशला या सर्व मोहमायेत फार इंटेरस्ट नव्हता. मात्र तरुणाने नकार दिला.

पण तरुणी आपल्या हट्टावर ठाम आहे. तरुणीने मनाशी ठरवलेलं, लग्न करेन तर याच्याशीच नाहीतर कुणाशीच नाही, अगदी सिनेमातल्या 'तु नही तो और कोई नही' टाईप. तर दुसऱ्या बाजूला नवलेशही आपल्या नकारावर ठाम. 

तरुणी इरेला पेटली, खाणं पिणं सोडलं. अखेर घरच्यांना आपल्या मुलीचं लफडं समजलं. सर्व प्रकरण घरच्यांना समजल्याने आता बाजार उठला होता. आपल्या मुलीला नकार देत असल्याने तिच्या घरच्यांनी मुलावर लग्नासाठी दबाव बनवायला सुरुवात केली.

नवलेश आणि ती तरुणी एकाच जातीचे. दोघांची एकच जात असल्याने गावात ग्रामसभा घेण्यात आली. नवलेश आणि त्या तरुणी अशा दोघांचे कुटुंबिय एकत्र आले. या तरुणीने सर्वांसमोर जबरदस्त डेरिंग दाखवली. 

ग्रामसभेतही ती आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने भर ग्रामसभेत पुन्हा एकदा प्रेमाची कबुली दिली. मात्र नवलेश आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने पुन्हा नकार दिला. यानंतर तरुणीने जीव देण्याची धमकी दिली.

"मला तरुणीचे कुटुंबिय घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत आहेत", असं नवलेश म्हणाला. नवलेश या सर्व प्रकाराला वैतागला. अखेर त्याने सबलगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवलेशने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. तसेच सुरक्षा देण्याची मागणीही केली.

"सबलगड पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. या एकतर्फी लव्ह स्टोरीची दुसरी बाजू म्हणजे दोघेही सज्ञान आहे. दोघांमध्ये आधीपासून मैत्री आहे. तरुणीला आता नवलेशसोबत लग्न करायचंय. दोघेही एकाच समाजातील आहे. यात पोलीस काहीच करु शकत नाहीत", अशी प्रतिक्रिया एडिशनल एसपी रायसिंह नरवरिया म्हणाले. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील आहे.