NEW YEAR आधी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल

वीकेंड आणि इअरएण्ड सेलिब्रेशनसाठी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल 

Updated: Dec 27, 2020, 08:47 PM IST
NEW YEAR आधी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल title=

रायगड : वीकेंड आणि इअरएण्ड सेलिब्रेशनसाठी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले आहेत. मुंबईपासून जवळ असल्यानं रायगडमध्ये पर्यटकांची बरीच गर्दी झाली आहे. गेले जवळपास ९-१० महिन लॉकडाऊन होतं. त्यातून आता बाहेर पडत लोकांनी आता कुठे आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे.

गेल्या तीन दिवसात अलिबाग, काशिद , मुरूड दिवेआगर हरिहरेश्‍वरच्या किनार्‍यांवर 40 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. समुद्रावरच्या घोडागाड्या, उंटांची सवारी, पॅरासेलिंग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांची धमाल पर्यटक घेत आहेत. बऱ्याच काळानं पर्यटकांची संख्या वाढल्यानं व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.

सलग आलेल्या सुट्ट्या आणि ख्रिसमसच्या निमित्ताने पर्यटकांनी रायगड आणि कोकणात मोठी गर्दी केली होती. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अजूनही पर्यटक येथे येत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि होम स्टे फुल्ल झाले आहेत. प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.