राज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा!

Atul Parchure Viral Video: तुला काय वाटतं राज ठाकरे (Raj Thackeray) कसा माणूस आहे? असा सवाल अतुल परचुरेंना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं कौतूक केलं.

Updated: Jul 12, 2023, 06:41 PM IST
राज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा! title=
Atul Parchure on Raj Thackeray

Atul Parchure on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि कलाक्षेत्र यांचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. अनेक कलाकार मंडळी राज ठाकरे यांचं कौतूक करताना दिसतात. चित्रपटांना थेटर मिळवून देण्याचा विषय असो वा अन्य काही खळखट्याक वाजल्याशिवाय राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीसाठी राज ठाकरे नेहमी सरसावल्याचं दिसून येतं. अशातच आता राज ठाकरे यांचे शाळेतील मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी मनसे अध्यक्षांचं तोंडभरून कौतूक केलंय. 

राज ठाकरेंना संधी देऊन बघा, असे बॅनर लागलेले असतात. अनेकजण त्याबद्दल बोलतात. सर्वांना त्याबद्दल कौतूक आहे, कारण कला क्षेत्राबद्दल जेवढी त्यांना अपुलकी आहे, तशी इतर कोणाला पहायला मिळत नाही. तुला काय वाटतं राज ठाकरे कसा माणूस आहे? असा सवाल अतुल परचुरेंना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी (Atul Parchure on Raj Thackeray) रोखठोक उत्तर दिलं.

राज ठाकरे मध्ये बदलण्याची इच्छा आहे. त्याला मनापासून वाटतं की हे सगळं चाललंय ते बदललं पाहिजे. मला त्याबद्दल खात्री आहे. मी त्याला शाळेपासून ओळखतो. राज ठाकरे म्हणतो, मी आहे ना... हा पाठिंबा महत्त्वाचा असतो. राज ठाकरे अनेकदा मला भेटून गेला, असं अतुल परचुरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे माझ्यापेक्षा एका वर्षापेक्षा लहान आहेत, असं अतुल परचुरे सांगतात. राज ठाकरे यांनी यांनी मला किस्सा सांगितला होता. 

आम्ही जेव्हा शाळेत होतो, तेव्हा मी नाटक करायचो. मी जेव्हा शाळेत येयचो, तेव्हा राज ठाकरे उभे रहायचे आणि दुसऱ्या मुलांना म्हणायचे, हा अतुल परचुरे बरं का जो नाटकात काम करतो. मी शाळेत स्टार होतो. बालनाट्यात काम करायचो, त्यामुळे मी तेवढ्यापूरतं फेमस होतो. आम्ही कॉलेजमध्ये आलो तेव्हा आमची रेग्युलर भेट व्हायची, असं म्हणत त्यांनी शाळेतील आठवणी जाग्या केल्या.

पाहा Video

दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडे ते व्हिजन आहे. मला त्याचं आश्चर्य नाही वाटत कारण तो माझा मित्र आहे. तो चांगला नेता आहेच, पण तो यारो का यार आहे. मी खूप तास त्याच्याबरोबर राहिलं आहे. राज ठाकरे एकटे आहेत. त्यांना ताकद देण्याची गरज आहे, असं मत देखील अतुल परचुरे यांनी मांडलं आहे.