ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण : डॉ. पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी डॉक्टर पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण : डॉ. पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी : ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी डॉक्टर पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

रुग्ण न तपासता केवळ फोनवरून चर्चा करून उपचार केले जात असल्याचा हलगर्जीपणा अतिशय टोकाचा आहे. त्यामुळे ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यूबाबत सखोल तपास करण्यासाठी हे पूर्ण प्रकरण पोलिसांना देणं आवश्यक आहे, असा युक्तीवाद विशेष खासगी वकील अॅड. संकेत साळवी यांनी न्यायालयात केला. 

रुग्णांवरील उपचारासाठी पुण्यातून मॉनिटर करण्यात आलेली ही कसली सेवा ? असे म्हणणे मांडत अॅड. संकेत साळवी यांनी पावसकर दाम्पत्याची चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला असून आता पावसकर दाम्पत्याला अटक होण्याची शक्यता आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close