गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Updated: Oct 31, 2022, 07:35 PM IST
गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश title=
maharashtra government order to repair Ambet Mhapral Bridge after gujarat morbi bridge collapse news nz

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अशातच काल संध्याकाळी 31 ऑक्टोबरला गुजरातमधील मोरबी इथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 132 जणांचा बळी गेला. हा पूल साडेसहा वाजता कोसळला. हा पूल कोसळल्यानंतर महाराष्ट्र प्रशासनाचे डोळे मात्र उघडले. (maharashtra government order to repair Ambet Mhapral Bridge after gujarat morbi bridge collapse news nz)

 

रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल धोकादायक झाल्यामुळे पुन्हा बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पूल धोकादायक झाल्यामुळे १२ कोटी खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु दुरुस्ती काम केल्यानंतर वाहतूकीसाठी पूल खुला कऱण्यात आला होता. परंतु आता पुन्हा या पूलाचे खांब झुकले असल्याचे समोर आले आहेत. पुलाचा वरचा भाग चांगला दिसत असला तरी खांब पश्चिमेच्या दिशेने झुकले आहेत. वाहतूकीदरम्यान दुर्घटना घडू नये यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा - "माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित!

 

मात्र पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना गुजरात पूल कोसळल्यानंतर परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव झाली. आणि लगेचच आंबेत पुलाच्या दुरुस्ती कामाची निविदा तातडीने पूर्ण करून येत्या 8 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याना जोडणारा हा पूल धोकादायक झाल्याने गेली 3 वर्षे वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो आहे.

हे ही वाचा - मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

 

सावित्री नदीवरील पूल तीन तीन तालुक्यांना जोडतो. गेल्या 3 वर्षांपासून वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे स्थानिक नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती. नागरिक आता महाडमार्गाने प्रवास करत होते.  लवकरच हा पूल दुरुस्त होईल अशी आशा व्यक्त करण्याव्यतिरिक्त नागरिकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.