"माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित!

खुद्द देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उत्तर द्यावं लागल्याने आता रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 31, 2022, 07:06 PM IST
"माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित! title=
Devendra fadanvis on Bachu Kadu

Devendra fadanvis : मागील काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद उफाळून आल्याचं पहायला मिळतंय. वाद एवढा पेटलाय की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आक्रमक टीका केली. वाद टोकाला गेल्याचं पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी केली आणि वाद शमवण्याचा प्रयत्न केलाय. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Devendra Fadnavis?

बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय. बच्चू कडू गुवाहटीला नक्की का गेले? यावर बोलताना फडणवीसांनी गुपित फोडलं. बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला होता, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

आपल्याला सरकार बनवायचंय, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या गटात यावं, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. त्यानंतर बच्चू कडू शिंदे गटासोबत सामील झाले, असंही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलंय. 

बच्चू कडू यांनी (Bachu Kadu) शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे, असंही ते म्हणाले आहेत. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही, असं स्पष्टीकरण देखील फडणवीसांनी दिलंय.

आणखी वाचा - मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

दरम्यान, खुद्द देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उत्तर द्यावं लागल्याने आता रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता येतील आणखी प्रबळ झाली आहे. त्यामुळे आता राणा कडू भांडणाचा फायदा थेट बच्चू कडू यांना झालाचं चित्र समोर आलंय.