ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ याच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं मुश्रीफांकडून आयोजन करण्यात आलं आहे.   

प्रताप नाईक | Updated: Jun 23, 2023, 03:02 PM IST
ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) सरकारकडून 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबला जात आहे. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे (NCP) बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या कार्यक्रमावर सडकून टीका केली होती. आता मात्र त्यांनीच हा कार्यक्रम हाती घेतला आहे .एवढंच नव्हे तर त्यांनी या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो लावले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत असलेल्या या फोटोमुळे मुश्रीफ यांचं नेमके चाललंय काय अशी जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर इडीचे छापे पडले होते .त्यामुळे तर मुश्रीफ सरकारच्या जवळ जात आहे. का असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. शिंदे फडणवीस यांचे फोटो लावणाऱ्या मुश्रीफ यांना ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांचाही विसर पडल्याने ही शंका अधिक बळकट होत आहे. पण हसन मुश्रीफ यांनी याचा इन्कार केला असून शासन आपल्या दारी यातील बहुतांश योजनांचा जन्म मीच घातला आहे त्यामुळे हा कार्यक्रम घेत असून राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम असल्याने आघाडीच्या इतर नेत्यांचा या पोस्टरवर उल्लेख नसल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पोस्टरबाजी नंतर शिंदे सेनेनेही त्यावर प्रतिक्रिया दिलीय. अगोदर मुश्रीफ टीका करत होते मात्र आता आम्हाला फॉलो करत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करू असं सांगत राजेश क्षीरसागर यांनी मुश्रीफ यांच्या पोस्टरबाजीला समर्थन दिलंय.

मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. घोटाळ्याचे आरोप करत सोमय्या यांनी मुश्रीफांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. 

ईडीकडून मुश्रीफ यांची चौकशी
घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरुकेली. 12 जानेवारी 2023 रोजी  हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचे (Hasan Mushrif Kagal Home ED Raid) अधिकारी दाखल झाले होते. तब्बल 14 तास  हसन मुश्रीम यांची चौकशी सुरु होती. हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील पार्टनरल चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने धाड टाकली होती. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसवर ईडीने छापे टाकले होते. कोलकात्याच्या कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप आहे.