पुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस

पुण्यात डेंगू पसरण्यास सोसायट्याच जबाबदार असल्याची माहिती पुढं आली आहे. डेंगूच्या डासांचं आगार बनलेल्या तब्ब्ल दोन हजार ८४९ सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढं आलं आहे.

Updated: Aug 8, 2017, 12:17 PM IST
पुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस title=

पुणे : पुण्यात डेंगू पसरण्यास सोसायट्याच जबाबदार असल्याची माहिती पुढं आली आहे. डेंगूच्या डासांचं आगार बनलेल्या तब्ब्ल दोन हजार ८४९ सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढं आलं आहे.

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. डासांची उत्पत्ती स्थळं शोधून त्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येत आहेत. महापालिकेनं आतापर्यंत अशा चार हजार ३४० नोटीस बजावल्या आहेत. त्यात सर्वाधिक नोटीस सोसायट्यांना देण्यात आल्या आहेत. शासकीय कार्यालयांना अगदी महापालिका आणि पोलीस ठाण्यांना देखील नोटीस देण्यात आल्या आहेत.

पाहा व्हिडिओ