Pune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य

Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा? 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 17, 2024, 09:50 AM IST
Pune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य  title=

Pune Suicide News in Marathi: लग्नाची लगबग, हातावर मेहंदी रंगली, वऱ्हाडी लग्नस्थळी निघणार... तितक्याच नवरी आणि नवरदेवाच्या कुटंबियांना धक्का देणारी बातमी समोर आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथून मन हेलवणारी घटना घडली असून नवरदेवाने स्वत: च्या लग्नाच्या दिवशी विहीरीत उडी मारून आयुष्य संपवल. ही घटना मंगळवारी (16 एप्रिल) तळेगाव येथे उघडकीस आली आहे. सूरज राजेंद्र रायकर (28) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज रायकर याचा आज (17 एप्रिल) लग्न सोहळा पार पडणार होता. लग्नसराईचे दिवस म्हणून त्याच्या कुटूंबात लग्नाची धामधूम सुरु होती. मात्र आज लग्नाला बसण्याअगोदरच सुरजेने त्याच्या मामाला फोन केला होता की मला लग्न करायचे नाही. असं म्हणत तो लग्नाच्या आदल्या दिवशी घराबाहेर पहाटेच पडसा होतो. कुटूंबातील लोक जेव्हा सकळी उठले त्यानंतर बराच वेळ सुरज दिसेना म्हणून त्याची शोधाशोध सुरु झाली. मात्र सुरजचा कुठेही तपास लगाला नाही. त्यानंतर त्यांच्या घरापासून वाण्याचा मळा येथे विहीरीजवळ सुरज याची दुचाकी दिसून आली. यानंतर घरच्यांनी पोलिसांनी माहिती दिली. 

या घटनेनंतर पोलिसांनी अधिकचा तपास लावला असता, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने परिस्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळ शोध घेतल्यानंतर सुरजचा मृतदेह सापडला. त्याच्या आत्महत्येमुळे घराच्यांनी हंबरडा फोडला. लग्नाच्या दिवशी अशी घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्यापूर्वी सुरजने मामाला मेसेजमध्ये मला लग्न करायचे नाही अस म्हणतं आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आसे. या प्रकरणी तळेगाव अधिक तपास करत आहे. लग्नाच्या दिवशीच सुरजने असा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेले नाही. सुरजच्या आत्महत्येनंतर कुटूंबियांना लग्नाऐवजी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची वेळ नातेवाईकांवर आली. 

तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मावळ वन्यजीव संरक्षण पथकाला पाचारण केले. त्यांनी विहिरीतील घाण पाणी काढण्यास सुरुवात केली असता, दुपारी अडीचच्या सुमारास सुरजचा मृतदेह आढळून आला. नवरी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली. या घटनेने दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरजने लग्नास नकार दिला होता. त्याने लग्न करायचं नाही, हे कुटुंबियांना आधी कळवलं होत का. पोलिस चौकशीत याचा उलघडा होणार आहे. मात्र सध्या ज्या मांडवातून त्याचं वऱ्हाड जाणार होतं.