Raj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!

Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.

Updated: Jul 1, 2023, 04:51 PM IST
Raj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!  title=
Raj Thackeray On Buldhana Bus Accident

Raj Thackeray On Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बुलढाणा येथे बसचा अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरवरून पुण्याला (Nagpur to Pune) येत असलेल्या या बसला मध्यरात्री अपघात झाला अन् प्रवाशांना प्राण गमवावे लागले. अशातच आता राजकीय वर्तुळात सध्या या विषयावर चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.

काय म्हणाले राज ठाकरे ?

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.  महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रध्दांजली अर्पण करतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - टायर फुटून नाहीतर 'या' कारणामुळे झाला भीषण अपघात; बुलढाणा अपघाताबाबत RTO चा मोठा खुलासा

दरम्यान, अमरावती परिवहन विभागाने (Amravati RTO) या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे संतुलन बिघडले आणि चालकाच्या उजव्या बाजूचे चाक दुभाजकावर आदळलं. यामुळे बसचं एक्सेल तुटलं आणि बसचा डिझेल टँक फुटला, अशी माहिती समोर आली आहे.  टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीयांना कुठंही आढळलं नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) स्वत: अपघात स्थळाची जाऊन पाहणी देखील केली आहे.