उद्धव ठाकरेंचं आंगणेवाडीच्या भराडी देवीकडे साकडं...

आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झालीय. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत उपस्थित झालेत.  

Updated: Jan 27, 2018, 09:20 AM IST
उद्धव ठाकरेंचं आंगणेवाडीच्या भराडी देवीकडे साकडं...  title=

आंगणेवाडी, सिंधुदुर्ग : आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झालीय. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत उपस्थित झालेत.  

महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकू दे, असं साकडं उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीला घातलं. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंगणेवाडीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर त्यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं.  ॉ

यावेळी, बोलताना जसे इतर सगळे प्रकल्प गुजरातला हलवले जात आहेत तसेच कोकणतले वादग्रस्त प्रकल्प गुजरातला न्या... कोकणवासियांना तुमच्या उपकाराची गरज नाही, असा टोमणाही उद्धव ठाकरे यावेळी भाजपला हाणलाय.

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होतेय.

स्थानिक आंगणे मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रेची पूर्ण तयारी झालीय. आज पहाटे चार वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली असून त्यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आलीय.

भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळाने व्यक्त केलाय. यावर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.