राज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated: Dec 29, 2018, 07:39 PM IST
राज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार title=

सातारा : थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला राज्यातून तसेच परराज्यातून  दर वर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. गेल्या दोन दिवसांपासून इथं पारा कमालीचा घसरलाय. पारा चार अंशांच्या खाली गेलाय. वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी इथं मोठी गर्दी केलीय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक कडाका जाणवतोयं. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा जोर वाढत चाललाय. धुळ्यात २७ वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, थंडीने महाराष्ट्र गारठलाय. वाढत्या थंडीमुळं रब्बीच्या गहू आणि हरभरा या पिकांना मात्र लाभ होताना दिसतोय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक कडाका जाणवतोयं. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा जोर वाढत चाललाय. धुळ्यात २७ वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्याच्या इतिहासात सगळ्यात कमी म्हणजे २.२ अंश से. तापमान नोंदवण्यात आलंय. थंडीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. याआधी १९९१ मध्ये धुळे जिल्ह्यात २.३ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये तापमान ५.४ नोंदवले गेले होते. धुळे शहरासह जिल्ह्यात संध्याकाळी पाचपासून थंडीचा जोर वाढत असून सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळतंय. निफाड आणि परभणीमध्ये पारा नीचांकी तीन अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय.  नागपुरात ३.५ अंश से. तापमानाची नोंद झालीय. पुण्यातही पारा ५.९ अंशांवर आला असून हे दहा वर्षातलं नीच्चांकी तापमान आहे. 

उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे सुरु झालेली थंडीची लाट  राज्यात पसरलीय. त्यामुळे दोन दिवसापासून  परभणी गारठलंय. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदवले गेले. 3 अंश एवढ्या तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात झाली असून येत्या दोन दिवसात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. वाढती थंडी रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारी आहे. सध्या ज्वारी, हरभरा जोमात आहे. या थंडीचा या पिकांना मोठा लाभ होणार आहे.जागोजागी कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे.