राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकी

आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकीचा फोन आल्याची तक्रार मोपलवार यांनी केलीय.

Updated: Nov 14, 2017, 11:05 PM IST
राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकी

मुंबई : आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकीचा फोन आल्याची तक्रार मोपलवार यांनी केलीय. मांगले विरोधात तक्रार मागे घेण्याविषयी धमकावणारा फोन आल्याची तक्रार मोपलवारांनी केलीय. सतिश मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले यांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी या दाम्पत्यासह ५ जणांवर खंडणीप्रकरणी मोक्का दाखल केलाय.