टीम अण्णा गोंधळात

अण्णा हजारे छातीच्या इन्फेक्शनने आजारी पडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती सांगण्यात आलीये. याचाच परिणाम निवडणुकीचं धुमशान सुरू होण्याआधीच टीम अण्णा गोंधळलेल्या अवस्थेत सापडली आहे.

Updated: Jan 6, 2012, 04:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अण्णा हजारे छातीच्या इन्फेक्शनने आजारी पडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती सांगण्यात आलीये. याचाच परिणाम निवडणुकीचं धुमशान सुरू होण्याआधीच टीम अण्णा गोंधळलेल्या अवस्थेत सापडली आहे.

 

आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी प्रचार करण्याचं रणशिंग स्वतः अण्णांनी मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावरून फुंकलं होतं. मात्र, आता टीम अण्णांचे ब्रेन समजल्या जाणा-या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसविरोधी प्रचार हाच केवळ आपला अजेंडा नसल्याचं सांगितलंय. काँग्रेसला विरोध म्हणजे भाजपच्या ते पथ्यावर पडणार होतं. मात्र, कुशवाहसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश दिल्यानं भाजपला पाठिंबा कसा देणार अशी खंत केजरीवालांनी व्यक्त केली आहे.

 

तर अण्णांची सरकारने घोर फसवणूक केलीये, आणि त्याचाच अण्णांना मानसिक धक्का बसल्याचं केजरीवाल म्हणालेत. टीम अण्णांनी पक्ष स्थापन करावा असं अनेक लोकांनी सुचवल्याचं केजरीवाल म्हणालेत. मात्र, पक्ष स्थापन करण्याची आमची इच्छाही नाही आणि आमची तेवढी तयारीही नसल्याचं केजरीवालांनी मान्य केलंय. त्यामुळं आधीच मुंबईतल्या आंदोलनादरम्यान मिळालेल्या कमी प्रतिसादामुळं टीम अण्णा निराश झाली होती, आता अण्णांच्या आजारपणामुळं इतर सदस्यही गोंधळाच्या गर्तेत साप़डलेत.