अण्णागिरी नंतर आता फ्लॅश मॉब

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश मॉब आयोजीत करण्यात आला आहे

Updated: Dec 29, 2011, 07:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या  भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश  मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी  तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश  मॉब आयोजीत करण्यात आला आहे. अण्णांनी आपलं तीन  दिवसांचे उपोषण आधीच सोडलं असलं तरी आयोजकांनी यात  कोणताही बदल केलेला नाही.

 

ओआसिस प्रॉडक्शन्स प्रा.लि.चे सह संस्थापक निकुंज अग्रवाल, विरेंद्र मिश्रा आणि कुणार भंबानी हे या प्लॅश मॉबचे शिल्पकार आहेत. त्यांनी अण्णांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नागपुर शाखेशी सहकार्यही केलं आहे. अण्णांनी उपोषण सोडलं असलं तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. या ग्रुपने अनेक महाविद्यालयांशी सहभागी होण्यासाठी संपर्कही साधला होता. पण त्यांना त्यात फार यश आलं नाही.

 

अखेरीस त्यांनी फेसबुकवर पेज तयार केलं आणि मग त्यांना जोरदार प्रतीसाद मिळाला. त्यांना फ्लॅश मॉबसाठी १०० डान्सर्स हवे होते, बुधवारपर्यंत ७५ विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली. आता अग्रवाल आणि त्याच्या सहकार्यांना आशा आहे की हजारोंच्या संख्येनी हा प्लॅश मॉब पाहण्यासाठी हजेरी लावतील अशी आशा आहे. फेसबुकमुळे सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि बुधवारी ५० जण सरावासाठी हजर होते. भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्यासाठी जागृती करण्याच्या उद्दिष्टाने या फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आलं आहे. पण सार्वजनिक ठिकाणी नाचायच्या संधीचा लाभ उठवण्यासाठीच सहभागी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.