बॉलिवुडचे 'काका' राजेश खन्नांची एक्झिट

बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे. त्यांच्य निधनाने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Jul 18, 2012, 03:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती आज अधिकच खालावली होती. बांद्रा येथील कार्टर रोडवरील 'आशीर्वाद' या त्यांच्या राहत्या घरी आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिल्या सुपस्टारची एक्झीट झाल्याने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

 

गेल्या दोन महिन्यात त्यांना चारवेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले.  उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना बांद्रा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यांनी अन्नपाणी सोडले आहे. तसेत त्यांचा औषधांनाही काहीही प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. उपचारांना काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते.  मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार  रुग्णालयात होते. त्यांच्या घरी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

राजेश खन्‍ना हे ख-या अर्थाने बॉलीवूडचे पहिले सुपरस्‍टार होते. लागोपाठ १३ सुपरहिट देण्‍याचा विक्रम त्‍यांनी केला होता.  राजेश खन्‍ना यांनी १९८५ मध्ये चेतन आनंद यांच्‍या 'आखरी खत' या चित्रपटापासून त्‍यांनी फिल्‍मी दुनियेत पाऊल ठेवले. त्‍यानंतर त्‍यांनी 'आनंद', आरधना, कटी पतंग, रोटी, अमरप्रेम, सफर, सच्‍चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. 'दो दिलो के खेल मे' हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट त्‍यांचा अखेरचा ठरला.

 

 संबंधित बातम्या....