५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला

भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.

Updated: Mar 12, 2016, 04:22 PM IST
५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला title=

जयपूर : भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.

शिव सिंग हे राजस्थानमधील भरतपूरचे महापौर आहेत. ते करोडपती महापौर आहेत. त्यांना सरकारकडून लाल दिवाची गाडी देण्यात आली आहे. ते ज्यावेळी परीक्षा केंद्रावर पोहोचले त्यावेळी विद्यार्थी घाबरलेत. ज्यावेळी त्यांनी समजले ते दहावीच्या परीक्षेला बसलेत त्यावेळी हास्यकल्लोळ झाला.

परीक्षा केंद्रावर ते लाल दिव्याची गाडी घेऊन गेले. मात्र, दिव्यावर कॅप घालण्यात आली होती. त्यांना १९७१-९१७२ मध्ये मध्येच शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, त्यानी अभ्यास करणे सोडले नाही. त्यांना दहावी पास नसल्याचे वाईट वाटत होते. त्यांनी निर्धाराने पुन्हा परीक्षा देण्याचे ठरविले आणि ते यावर्षी शक्य झाले.

परीक्षा केंद्रावर कॉफी तपासणी पथक आले असताना विना तक्रार तपासणी करु दिली. तसेच आपले शुजही काढले. ते करोडपती महापौर असले तरी त्यांचा शहरात  पेट्रोल पंप असून अनेक व्यवसाय आहेत.