कोणाला किती झोप आहे आवश्यक?

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. मात्र हल्लीच्या कामाच्या धावपळीत योग्य प्रमाणात झोप मिळत नाही. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही विश्रांती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. 

Updated: Mar 10, 2016, 12:33 PM IST
कोणाला किती झोप आहे आवश्यक? title=

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. मात्र हल्लीच्या कामाच्या धावपळीत योग्य प्रमाणात झोप मिळत नाही. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही विश्रांती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. 

प्रत्येक वयोगटानुसार झोपेचे प्रमाण वेगवेगळे असते. लहान बाळांना म्हणजेच ३ ते ११ महिन्यांपर्यंतच्या बाळांना १४ ते १५ तासाची झोप आवश्यक असते. तर १२ ते ३५ महिन्यांपर्यंतच्या बाळांना ११ ते १३ तासांची झोप गरजेची असते. 

मुलाचे वय ३ ते ६ दरम्यान असल्यास अशा मुलांना ११ ते १३ झोप मिळायला हवी.  तर शाळेत जाणाऱ्या ६ ते १० वर्षादरम्यानच्या मुलांना १० ते ११ तास झोप हवी.
 
 ११ ते १८ वयोगटातील मुला-मुलीना साडेनऊ तास झोप मिळणे गरजेचे असते. त्यापुढील वयोगटातील लोकांना साधारण आठ तास झोप आवश्यक असते.