`आप`चे भाजप-काँग्रेसला खुले आव्हान, सरकार बनवा

दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2014, 03:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानींविरूद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसचं साटेलोटं झालं. आता त्यांनी एकत्रितपणे दिल्लीमध्ये सरकार बनवून दाखवावं, असं उघड आव्हान आपच्या नेत्यांनी दिलंय. याबाबत वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी तसे पत्रकार परिषदेत सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षाच्यावतीने देशव्यापी झाडू चलाओ यात्रा सुरू करण्यात येणार असून, देशातील प्रमुख २५ शहरांमध्ये जाहीर सभा होणार आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानेनंतर आम आदमी पार्टीने आज अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व करतील. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. देशात आम्ही जाहीर सभा घेणार आहोत. यामध्ये भ्रष्ट्राचावर प्रकाश टाकला जाईल, असे योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.