आता अंगठ्याने होणार पेमेंट

आता कोणताही आर्थिक व्यवहार करताना कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपल्या बोटांनी आपण सहज पेमेंट करु शकणार आहोत. परंतू त्यासाठी प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडला असला पाहिजे. आपला आधार नंबर बँक खात्याशी जोडला असेल तर आधार-पे च्या मदतीने आपण पेमेंट करु शकतो.

Intern - | Updated: Apr 13, 2017, 02:04 PM IST
आता अंगठ्याने होणार पेमेंट title=

नवी दिल्ली : आता कोणताही आर्थिक व्यवहार करताना कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपल्या बोटांनी आपण सहज पेमेंट करु शकणार आहोत. परंतू त्यासाठी प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडला असला पाहिजे. आपला आधार नंबर बँक खात्याशी जोडला असेल तर आधार-पे च्या मदतीने आपण पेमेंट करु शकतो.

१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आधार-पेची सुरूवात करणार आहेत. आधार-पेची सुरूवात करण्याआधी भोपाळ आणि दिल्लीमध्ये याविषयी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच छोटे-मोठे सर्वच आर्थिक व्यवहार आपण आधार-पेच्या आधारे करू शकणार आहोत.

या योजनेतून जनतेची कोणतीही फसवणूक होणार नाही, कारण प्रत्येकवेळी पेमेंट करताना फिंगर प्रिंट घेण्यात येतील असा दावा सरकारने या योजनेमागे केला आहे.