३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.

Updated: Mar 11, 2017, 11:31 AM IST
३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास title=

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.

भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मोदी लाट पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत ३७ वर्षानंतर पहिल्यांदा कोणत्यातरी पक्षाला २९० हून अधित जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी १९८० मध्ये काँग्रेसने ३०९ जागा जिंकल्या होत्या.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये येथे मुख्य लढत होती. काँग्रेसला स्वत:वर विश्वास नसल्याने त्यांनी सपासोबत लढणं पसंत केलं. बसपाला देखील लोकांनी येथे साफ नाकारलं. एक्जिट पोल पुन्हा एकदा खरं ठरतांना दिसले. भाजपने उत्तर प्रदेशात मोठं यश मिळवलं आहे.