उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

उत्तरप्रदेश निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 

Updated: Mar 6, 2017, 10:13 AM IST
उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार title=

लखनऊ : उत्तरप्रदेश निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 

येत्या आठ तारखेला पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान होईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वारणसीचाही समावेश आहे.  

पंतप्रधानांनी स्वतः गेल्या दोन दिवसांपासून वाराणसीत प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय. रविवारी दुस-या दिवशी त्यांनी रोड शो केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मोदींनी पांड्येपूर ते काशी विद्यापीठापर्यंत मेगा रोड शो केला. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. 

मतांचा जोगवा मागण्यासाठी मोदी मतदारांपर्यंत या रोड-शोच्या माध्यमातून पोहचतायत. या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी यांची काशी विद्यापीठाच्या मैदानात जाहीर सभा झाली. या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.