रेल्वेचा नवा नियम : महिन्याला होणार फक्त सहा तिकीटांचं बुकींग

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता एक धक्कादायक बातमी आली आहे.

Updated: Jan 29, 2016, 11:19 AM IST
रेल्वेचा नवा नियम : महिन्याला होणार फक्त सहा तिकीटांचं बुकींग title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता एक धक्कादायक बातमी आली आहे. रेल्वेनं तिकीट बुकींच्या नियमांत थोडे बदल केले आहेत. 

ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आता एका आयडीरुन आता एका महिन्यात केवळ सहा तिकीटं बुक करता येणार आहेत. आत्तापर्यंत ही मर्यादा दहा तिकीटे इतकी होती. येत्या १५ फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

केवळ १० टक्के प्रवासी महिन्याला दहा तिकीटे बुक करतात, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. दलालांतर्फे या सुविधेचा अनेकदा गैरवापर केला जातो, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. 

रेल्वेच्या या निर्णयावर प्रवासी मात्र नाखूश आहेत. जे प्रवासी नेहमी रेल्वेने प्रवास करतात अशांसाठी हा नवा नियम आता डोकेदुखी ठरणार आहे. आता एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार करण्याची गरज भासू शकेल, असेही काहींचं म्हणणं आहे.

दलालांना रोखण्यासाठी रेल्वे अनेक योजना करत आहे. हा नियम याच प्रयत्नांचा भाग असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.