आणखी एक स्वप्न पडले...२,५०० टन सोन्याचे!

एक हजार टन सोन्याचे पहिले स्वप्न एका साधुला पडल्यानंतर आता आणखी एक स्वप्न पडले आहे. ते आहे २,५०० टन सोन्याचे! शोमन सरकारने नवा दावा केला आहे. फतेहरपूरमधील आदमपूर गावातील रीवा राजाच्या किल्ल्यात शिव चबुतर्‍यानजीक २५०० टन सोने असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 12:46 PM IST

www.24taas.com ,वृत्तसंस्था, लखनऊ
एक हजार टन सोन्याचे पहिले स्वप्न एका साधुला पडल्यानंतर आता आणखी एक स्वप्न पडले आहे. ते आहे २,५०० टन सोन्याचे! शोमन सरकारने नवा दावा केला आहे. फतेहरपूरमधील आदमपूर गावातील रीवा राजाच्या किल्ल्यात शिव चबुतर्‍यानजीक २५०० टन सोने असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
एका साधूने स्वप्नात थोडेथोडके नव्हे तर तब्बल एक हजार टन सोने पाहिले आणि त्याने सांगितलेल्या जागेवर पुरातत्व खात्याने तर उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये काल शुक्रवारपासून खोदकाम मोहीम सुरू झाली. आज दुसरा दिवस आहे. एक हजार टन सोन्याचे हे साठे पेशव्यांचे असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे सोने सापडलेच तर ते आमच्या मालकीचे असेल असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
२५०० टन सोने असल्याचे शोमन सरकारने नवा दावा केला आहे. फतेहपूर येथील खोदकामासाठी १० लाख रुपये देतो. सोने नाही मिळाले तर हे पैसे मला देऊ नका. पण सोने मिळाले तर २० टक्के सोने स्थानिक विकास कामांवर खर्च करावे लागेल असे आव्हान शोमन सरकारने केंद्र सरकारला दिले आहे.
पुरातत्व खात्याने उन्नाव किल्ल्यामध्ये दोन ठिकाणी खोदले. जमिनीपासून २० मीटर खोल काहीतरी आहे असा दावा पुरातत्व अधिकार्‍यांनी केला आहे. खोदकामासाठी १५० मीटर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. तर दोंडिया खेडामध्ये १४४ कलम जारी करण्यात आले आहे. खोदकामाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.