पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती

बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2013, 03:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,पाटणा
बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.
वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या छप्रा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, गॅस गळतीमुळे एकच गौंधळ निर्माण झाला. अनेकांची पळापळ झाली.

छप्रातील सरकारी शाळेत अंदाजे ६० विद्यार्थ्यांना माध्यान्ह अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यात २३ विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. विद्यार्थ्यांना अन्न खाऊ घालणारी शाळेची मुख्याध्यापिका फरार आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये विरोधकांनी राजकीय वातावरण तापविले आहे. सर्व राग रस्त्यावर आलाय. जाळपोळीच्या घटना बिहारमध्ये घडत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.