यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

Updated: Mar 11, 2017, 02:25 PM IST
यु.पी.को बाप (मोदी) पसंद है' title=

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

या विजयानिमित्त पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनीही अनोख्या पद्धतीने मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. 

युपी को बाप पसंद है अशा शब्दात त्यांनी मोदींचे अभिनंदन केलंय. तसेच या विजयानंतर हे निश्चित झाले की लॅपटॉप वाटणाऱ्यांचा नव्हे तर वीज पुरवणाऱ्यांचा विजय झाला.