'जेएनयूमधला आवाज दाबणारे देश विरोधी'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. 

Updated: Feb 13, 2016, 08:59 PM IST
'जेएनयूमधला आवाज दाबणारे देश विरोधी' title=

नवी दिल्ली: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयूमधला आवाज दाबणारेच देशद्रोही आहेत, अशी टीका राहुल गांधींनी यावेळी भाजपवर केली आहे. 

जेएनयूमध्ये अफजल गुरुचा उदोउदो, स्वतंत्र काश्मिरच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी ही घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

 

विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी जेएनयूमध्ये गेले होते. 

दरम्यान राहुल गांधी जेएनयूमध्ये पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले आणि राहुल गांधी परत जा म्हणून घोषणाबाजी केली.