शिवसेना कायम आमचा मित्रच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेना कायम आमचा मित्र राहिला आहे. भविष्यातही आम्ही मित्र राहू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय.

Updated: Nov 22, 2014, 02:35 PM IST
शिवसेना कायम आमचा मित्रच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस title=

नवी दिल्ली :शिवसेना कायम आमचा मित्र राहिला आहे. भविष्यातही आम्ही मित्र राहू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय.

विशेष म्हणजे 'सामना'मध्येही मुख्यमंत्र्यांची स्तुती करण्यात आलीये. दरम्यान फडणवीस आज अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार, नवीन प्रदेशाध्यक्ष तसेच संघटनात्मक बदल याबाबतही चर्चा होणार आहे. त्याचवेळी ते पंतप्रधन नरेंद्र मोदींचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथे सहकार मंत्र्यांनीही तसा दावा केला. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल, असा विश्वास आज सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेशी सत्ता सहभागाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा पाटील यांनी केलाय. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सहभागी होणार का याची चर्चा आता सुरू झालीय.राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यात शिवसेना सहभागी असेल, अशी शक्यता आहे.

शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होती. तर भाजपने ही मागणी फेटाळून लावत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातूनही शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संबंध जवळपास पूर्ण तुटले होते. त्यातच विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान होत शिवसेनेने आपले इरादेही स्पष्ट केले होते. मात्र आता चंद्रकांतदादा पाटील यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना जोर मिळालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.