'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!

दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.

Updated: Sep 12, 2015, 05:32 PM IST
'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद! title=

मुंबई : दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.

अमेरिकेतल्या एका दाम्पत्यानं (नाव जाहीर न करण्याची विनंती केल्यानं नाव देण्यात आलेले नाही) 'झी २४ तासवरील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची बातमी पाहिली... 'झी २४ तास'वरील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहून अमेरिकेत राहणाऱ्या या दाम्पत्याचं काळीज हेलावलं.

अधिक वाचा - 'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'

हे दाम्पत्य न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात... त्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या भावाला मदतीचे चेक घेऊन 'झी २४ तास'च्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत केलीय. 

प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये असे तब्बल सात चेक त्यांनी  'झी २४ तास'कडे मदत म्हणून सोपवलेत. 

अधिक वाचा - ...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर

बळीराजा अडचणीत आला असताना काही तरी सामाजिक मदत आपल्याकडूनही व्हावी, हा आपला हेतू असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नोट : तुम्हालाही दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी मित्रांना मदत करायची इच्छा असल्यास या पत्त्यावर / क्रमांकावर संपर्क साधा

पत्ता - झी न्यूज, चौथा मजला, बी विंग, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पी बी मार्ग, वरळी, मुंबई - ४०००१३

संपर्कासाठी क्रमांक - ०२२-२४८२७८२१

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.