रैनाच्या सेंच्युरीनंतर पूनमकडून असं अभिनंदन!

सोशल मीडियावरील स्टार आणि आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  वर्ल्डकपमध्ये भारतानं झिम्बाब्वेला पराभूत केल्यावर तिनं ट्वीटरच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाचं कौतुक केलं आहे.

Updated: Mar 15, 2015, 03:34 PM IST
रैनाच्या सेंच्युरीनंतर पूनमकडून असं अभिनंदन! title=

मुंबई: सोशल मीडियावरील स्टार आणि आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  वर्ल्डकपमध्ये भारतानं झिम्बाब्वेला पराभूत केल्यावर तिनं ट्वीटरच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाचं कौतुक केलं आहे.

रैना आणि धोनी मैदानात फलंदाजी करत असतांना ती ट्विटरवरून त्यांना प्रोत्साहन देत होती.

तसंच यंदाही भारत वर्ल्डकप आपल्या हातातून जाऊ देणार नाही, असंही ट्वीट पूनमनं केलं आहे.

वर्ल्डकप २०११ मध्ये भारत वर्ल्डकप जिंकल्यास न्यूड होऊ, या तिच्या वक्तव्यानं ती चांगलीच चर्चेत आली होती.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.